01:25pm | May 04, 2024 |
सातारा : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याची तीव्रता ही वाढत आहे. अशा परिस्थितीत ही उमेदवार हे मतदारांना भेटण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. सकाळची वेळ आणि संध्याकाळपासून प्रचाराची मुदत असेपर्यंत उमेदवार हे मतदारांना गाठण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिवस कमी आणि दौरे जास्त असल्याने निर्धारित वेळेपर्यंत सभेच्या स्थळावर पोहोचणे अनेकदा अवघड होते. वाई तालुक्यात अशीच वेळ भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर आली. मात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याची उदयनराजेंची तळमळ ही मतदारांच्या दृष्टीने कौतुकाची बाब ठरली.
त्याचं झालं असं, वाई तालुक्यातील पसरणी येथे उदयनराजे भोसले यांची प्रचार सभा होती. वेळ सायंकाळ नंतरची, उदयनराजे एका विवाह समारंभात व नंतर कार्यकर्ते नेत्यांच्या गाठीभेटीत व्यस्त होते. पसरणी येथील सभेची वेळ होऊन गेली होती. मात्र सभेच्या ठिकाणी पोहोचणे देखील अवघड झाले होते. वेळ पुढे सरकत होती. उदयनराजे यांचे कार्यकर्ते विकास शिंदे विजय नायकवडी तसेच आरपीआयचे नेते अशोक बापू गायकवाड यांनी उदयनराजे येईपर्यंत दमदार भाषणांनी सभेची खिंड लढवली. त्यांचे येणे जसजसे अवघड आणि अशक्य होत आहे, हे लक्षात आल्यावर स्वतः उदयनराजे यांनी शक्कल लढवली. तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी मोबाईल वरून सभा घेण्याची ठरवले. पसरणीच्या कार्यकर्त्यांनी तशी व्यवस्था केली, आणि उदयनराजे यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले.
वाईकर मंडळींशी मोकळेपणाने संवाद साधत उदयनराजे यांनी वाईचा विकास वाईची, एमआयडीसी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. रोजगार निर्मिती, कृषी विषयक उपक्रम , हळद, आले संशोधन व प्रक्रिया उद्योग वाईत उभारण्याचे ठोस आश्वासन यावेळी उदयनराजे यांनी उपस्थितांना दिले.
एकूणच उदयनराजे भोसले यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कार्यकर्ते आणि मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजे यांनी केलेली धडपड मतदारांबद्दल त्यांची आस्था आणि प्रेम स्पष्ट करणारी होती. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ती कौतुकाची बाब होती.
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |