सातारा : सातारा जिल्ह्यातील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी महाबळेश्वर व फलटण या दोन नगरपालिकांच्या निवडणुका तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे निर्देश रात्री उशिरा जाहीर केले. उमेदवारांच्या अपिला संदर्भात विलंबाचे तांत्रिक कारण पुढे आल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या दोन्ही नगरपालिकांसाठी आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
फलटण व महाबळेश्वर पालिकांच्या निवडणुका तांत्रिक कारणांमुळे पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला दोन्ही पालिकांसाठी वीस डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे .राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्जाच्या छान आणि नंतर दाखल झालेल्या अपील यांवर जिल्हा न्यायालयाने 22 नोव्हेंबर पर्यंत निकाल देणे अपेक्षित होते मात्र काही ठिकाणी हे निकाल 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर लागले आहेत परंतु नियमानुसार उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी मिळणे अपेक्षित होते तो मिळाला नाही त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
फेरबदलानंतरचा कार्यक्रम असा
निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे -4 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेणे - 10 डिसेंबर
उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्ह नेमून देणे - 11 डिसेंबर
मतदान प्रक्रिया - 20 डिसेंबर
मतमोजणी - 21 डिसेंबर
निकाल प्रसिद्धी - 23 डिसेंबर