वणव्यात होरपळला अजिंक्यतारा

सातारा पालिका अग्निशमन दलाने आणली आग नियंत्रणात

by Team Satara Today | published on : 23 March 2025


सातारा : सातारा हद्दवाढीमुळे सातारा शहरात आलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील हनुमान मंदीर परिसरातील वृक्षसंपदा रविवारी दुपारी १२ वाजता कोणीतरी अज्ञाताने लावलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. किल्ल्यावर धुराचे मोठ्या प्रमाणात लोट सुरु होते. ही माहिती सातारा नगर पालिका अग्निशमन दलास मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून ही आग आटोक्यात आणली.

किल्ले अजिंक्यतारा परिसर आणि डोंगर उतार गर्द वनराईने समृध्द आहे. या वनराईत सागाची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे मोरांचे वास्तव्यही बऱ्यापैकी आहे. ससे, घारींची घरटी, काळ्या चिमण्याही मोठ्या प्रमाणात आहेत. अज्ञाताने लावलेल्या या आगीनंतर काही वेळातच धुरांचे मोठ्या प्रमाणात लोट सुरु झाले. ही घटना साताऱ्यातील श्रीनिवास कुलकर्णी यांच्या दुपारी १ वाजता निदर्शनास येताच त्यांनी ही बाब तत्काळ सातारा नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यानंतर अग्निशमन अधिकारी सुनील निकम, फायरमन सुनील पारधे हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे या डोंगर उतारावरील वनराईमधून ससे, काळ्या चिमण्या या जीवाच्या आकांताने सैरभर धावू लागले होते. अनेक वन्यजीवही या आगीत होरपळे आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण आणताना काहींनी झाडाच्या पानांचा खराटा करुन आग नियंत्रणात आणण्यात मदत केली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
पुढील बातमी
भाजी मंडई परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या