01:56pm | May 04, 2024 |
सातारा/पुसेगाव : साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, अशी भाकणूक आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली, उदयनराजे भोसले यांनीही विसापूर बोबडेवाडी भागाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.
बोबडेवाडी (विसापूर) संत बाळूमामा यांच्या मंदिरात आयोजित केलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्यासाठी महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली.
याप्रसंगी उदयनराजेंच्या विजयाची भाकणूक करण्यात आली. संत बाळूमामाच्या हजारो भक्तांच्या साक्षीने ही भाकणूक झाली. आदमापूर येथील गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी ही भाकणूक लावली आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयाची घोषणाच केली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या हजारो भक्तगणांनी उदयनराजे भोसले यांच्या नावाचा जयघोष केला.
याप्रसंगी उदयनराजे भोसले म्हणाले, संत बाळूमामा यांच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. हजारो भक्तगणांच्या साक्षीने या परिसराच्या विकासाचे आश्वासन देतो.
आमदार महेश शिंदे म्हणाले, उदयनराजेंनी कृष्णा खोरे महामंडळाचा पाया रचला आहे. या दुष्काळी भागातील जी पाणी योजनेची कामे पूर्ण झाली, ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या हात बळकट करा.
साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे म्हणाल्या, मी विसापूर गावची माहेरवाशीण आहे. संत बाळूमामा मंदिरात जे भाकित होते, ते सत्य झालेले आहे. या भागासाठी मी जी कामे महाराजांकडे मागितली, ती त्यांनी केलेली आहेत. विसापुर, बोबडेवाडी व बुधावलेवाडी या रस्त्याचे काम मंजूर करून घेण्यात आले आहे. आचारसंहिता संपताच हे काम सुरू होईल, येत्या ७ मे रोजी कमळ चिन्हा पुढील बटन दाबून उदयनमहाराजांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करण्यात आला.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |

बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |