सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील पर्यावरण विभाग, अजिंक्यतारा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शाहूनगर, शेंद्रे यांच्यावतीने बुधवारी चिमुकल्या ‘अजिंक्य पुत्रांचा’ प्लास्टिक पिशवी मुक्तीसाठी जागर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व शिक्षण संस्थेचे सचिव जिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभाग आणि अजिंक्यतारा विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांविरोधात हाती फलक घेऊन व घोषणा देत शेंद्रे फाटा झेंडा चौक येथील भाजी मंडई परिसरात जनजागृती फेरी काढली.
यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे सेक्रेटरी बशीर संदे, लेबर ऑफिसर ऍड.रणजितसिंह चव्हाण, पर्यावरण विभाग प्रमुख बी. डी. पोवार, हेड टाईम किपर राजाराम कणसे, शेंद्रे ग्रामपंचायत सरपंच अस्लम मुलाणी, माजी उपसरपंच सोपान भोसले, अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतनचे प्राचार्य सतिश धुमाळ, छत्रपती शाहू आयटीआयचे प्राचार्य विजय मोहिते, मुख्याध्यापक शंकर पवार, उपशिक्षक अजित कणसे, उपशिक्षिका सौ.रोहिणी कोळी आदी मान्यवरांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करीतच या मान्यवरांनी भाजी मंडईतील विक्रेते व नागरिकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगत प्लास्टिकच्या वापरावर स्वयंस्फुर्तीने बंदी घालून पर्यायी कापडी पिशव्या वापरण्याबाबत आवाहन केले.