संग्राम बर्गे यांची चोरीला गेलेली इनोवा क्रिस्टा गाडी 24 तासात हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी कसोशीने तपास केल्याचे फलित

by Team Satara Today | published on : 14 December 2024


सातारा : सातारा भाजपचे युवा नेते संग्राम बर्गे यांची चोरीला गेलेली इनोवा क्रिस्टा कार केवळ 24 तासात हस्तगत करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री विलासपूर परिसरातून भाजपचे युवानेते संग्राम बर्गे यांची एमएच 11 सीएच 9999 क्रमांकाची इनोवा क्रिस्टा ही गाडी चोरट्यांनी चोरुन नेली होती. या चोरीचा घटनाक्रम संग्राम बर्गे यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला होता. बर्गे यांनी या घटनेची माहिती तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात कळवली व तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सातारा पोलीस दलाने इतर जिल्ह्यांमध्ये वायरलेस संदेश पाठवून तपास सुरु करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी कसोशीने तपास केल्याने गाडी शोधण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले.

यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी संग्राम बर्गे यांच्याशी संपर्क साधून त्यांना गाडी सापडल्याचे सांगण्यात आले व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून गाडी आपणास सुपूर्द करण्यात येईल, असेही सांगितले. यानंतर संग्राम बर्गे यांनी पुणे ग्रामीण पोलीस व सातारा पोलिसांचे आभार मानले आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद

संबंधित बातम्या