04:35pm | Sep 03, 2024 |
नवी दिल्ली : बुलडोझर बाबा म्हणून सध्या गुन्हेगारांच्या घरांची तोडफोड केल्याचं समर्थन केलं जात आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील काही गुन्हेगार व आरोपींच्या घरांची प्रशासनाकडून थेट तोडफोड करण्यात आली होती. आता, सर्वोच्च न्यायालयाने या बुलडोझर तोडफोड प्रकरणावरुन सरकारचे कान टोचले आहेत. 2 सप्टेंबर 2024 रोजी बुलडोझर कारवाईचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. उदयपूर येथील चाकूने मारहाण केल्याच्या आरोपीच्या वडिलांचे घर बुलडोझरने तोडण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले. सुनावणीवेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहत यांनी म्हटलं की, नगरपालिकेच्या नियमांना अनुसरुनच नोटीस देऊनच अवैध निर्माण बांधकाम पाडले जाऊ शकते. कोण कुठल्या गुन्ह्यातील आरोपी आहे म्हणून ते पाडता येणार नाही. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाने काही दिशानिर्देश तयार करुन सर्वच राज्यांना याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारच्यावतीने तुषार मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडताना म्हटले की, जास्तीत जास्त प्रकरणात अवैध बांधकाम उभारणीबद्दल अगोदरच नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावर, न्यायालयाने म्हटले की, आम्हीही अवैध बांधकामांच्या मालकांना वाचवण्याच्या बाजुने नाहीत. मात्र, एखाद्या मुलाच्या चुकीची शिक्षा म्हणून त्याच्या बापाचे घर पाडणे हे योग्य नाही, अशा शब्दात न्यायालयाने वकिलांना सुनावले. त्यावर, वकिल मेहता यांनीही सर्वच पक्षकारांचे समाधान करणार असल्याचे म्हटले. दरम्यान, उदयपूर चाकू प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी बांधलेल्या घरावर झालेल्या बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने परखड भाष्य केलं आहे. एका वडिलांचा मुलगा आडमुठा असू शकतो, मात्र त्यामुळे त्या वडिलांचे घर पाडणं योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशात गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्यान्वये शिक्षा दिली जात असताना, त्याचे घरही बुलडोझर चालवून तोडले जात असल्याच्या अनेक घटना समोर आले आहेत. येथील गुंडागर्दीवर बुलडोझर फिरवला जात असल्याचं सांगत ही कारवाई केली जाते. तर, महापालिका किंवा तत्सम यंत्रणांकडून अवैध बांधकामाचे कारण पुढे केले जाते. मात्र, घरातील एकाने केलेल्या गुन्ह्याची सजा घर पाडून कुटुंबातील इतरांना देणे कितपत योग्य असल्याचा सवालही समाजातून विचारला जात होता. आत, न्यायालयानेही हीच बाब अधोरेखित केली आहे.
तुषार मेहता यांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश यांनी म्हटले की, वरिष्ठ वकिल नचिकेता जोशी यांच्याकडे आपल्या सूचना मांडाव्यात. त्या सूचनांचे अध्ययन केल्यानंतर संपूर्ण देशासाठी एक मार्गदर्शन सूचनांची एसओपी बनवण्यात येईल. आता, याप्रकरणी पुढील सुनावणी 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |