पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक

by Team Satara Today | published on : 03 January 2025


सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी वृद्धेची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मनकर्णिका गणपत जाधव रा. कोडोली, सातारा या वृद्धेला दोन भामट्यांनी आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून, त्यांना फसवून त्यांच्याकडील चाळीस हजार रुपये किंमतीची, एक तोळे वजनाची सोन्याची चैन घेऊन गेले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा !
पुढील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता

संबंधित बातम्या