सातारा : जुन्या वादाच्या कारणातून दारूच्या नशेत दांपत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी सुचित्रा सुनील रामाणे (वय 42 रा. मंगळवार पेठ सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
अल्ताफ सलीम शेख (रा. दस्तगीर कॉलनी) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल फिर्यादीनुसार शेख व रामाणे हे एकमेकांना ओळखत असून त्यांच्यामध्ये जुने वाद आहेत. दि. 9 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख याने दारूच्या नशेत दांपत्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली पोलीस उपनिरीक्षक एस. के. बागवान तपास करत आहेत.