सातारा : एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार
केल्या प्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.
16 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास देगाव फाटा सातारा येथे पैसे
देण्यास नकार दिल्याने अजय राहुल नलवडे रा. विलासपूर, सातारा या
अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्या प्रकरणी वेदांत जेरी, अजिंक्य डांगे,
युवराज
चव्हाण, साहिल गौतम रणदिवे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा यांच्या
विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला
पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; चार जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 18 December 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा