सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाढे फाटा परिसरात दोन माल ट्रक आणि एक मोटार एक दुसऱ्यावर आढळून तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जखमी जखमी झाले. या अपघाताचा मोठा आवाज आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
महामार्गावर साताराहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर सातारा शहरातील वाढे फाटा हद्दीन मध्यरात्री तीन वाहनांचा मोठा अपघात झाला. भरधाव वेगातील माल ट्रक एकमेकांवर आदळले. दरम्यानच्या काळात शेजारून जाणारी एक मोटार ही त्यामध्ये सापडली.
या अपघातात ट्रक आणि मोटारीतील चार जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याला मिळताच तातडीने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे या ठिकाणची काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली