अपघातात एकाच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 September 2024


सातारा : अपघातात एकाचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी राष्ट्रीय महामार्गावर सेंद्रिय गावच्या हद्दीत अशोक लेलँड ट्रक क्र. युके 06 सीबी 7061 वरील अज्ञात चालकाने ट्रक रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभा केल्याने किरण गणपत वायदंडे रा. भिवडी, पोस्ट त्रिपुटी, ता. कोरेगाव हे चालवीत असलेल्या कारची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात किरण वायदंडे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्नीस मारहाण प्रकरणी पतीविरोधात तक्रार
पुढील बातमी
मद्यधुंद प्रवाशामुळे बेस्ट बसला भीषण अपघात

संबंधित बातम्या