सातारा : एकाला मारहाण करून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या व्यक्तीला केस मागे घे, असे म्हणून मारहाण करण्यात आली. यावेळी संबंधित व्यक्तीची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करून, अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी निलेश सुरेश पवार आणि सुरेश विठ्ठल पवार (दोघेही रा. करंजे पेठ, सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खलिफा करीत आहेत.