भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

by Team Satara Today | published on : 07 January 2026


सातारा  :  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईनड् डिफेन्स सर्व्हिस या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या पूणे यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सीडीएस-६६ कोर्ससाठी (किंवा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पुर्ण भरुन सोबत घेवून यावे. सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.  उमेदवार लोकसंघ आयोगनवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.pctcnashik@gmail.com  व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सअप क्र. 9156073306 (प्रवेश मिळवण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, ले दे. कर्नल हंगे स (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन
पुढील बातमी
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई; कराड विमानतळ प्राधिकरणाची बैठक

संबंधित बातम्या