सातारा : विसावा नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान केदार दगडू सूर्यवंशी रा. वरद नगर गार्डन, विसावा नाका, सातारा यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सव्वा पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि 11 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी असा एक लाख 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.