सातारा : कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथे कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अनिल श्रीरंग कासुर्डे (वय 39, रा. रांजणी ता.जावली) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. हा अपघात दि. 23 डिसेंबर रोजी झाला आहे.