सातारारोड : केंद्र सरकारने संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख वाटचाल केलेली आहे. सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन ते निघाले आहेत. रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी देखील भविष्यात मोठे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिले.
सातारारोड येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित केलेल्या रामोशी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे होते. याप्रसंगी आमदार महेश शिंदे, एडव्होकेट विशाल शिरतोडे, सुधीर बुधावले, गिरीश बुधावले, कपिल चव्हाण, बाळू जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.
उदयनराजे पुढे म्हणाले, मोदी सरकारने महिला, तरुण, वृद्ध, शेतकरी ,खेळाडू यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. भारताचे नाव जगभर गौरविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामोशी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीही भविष्यात कुठेही कमी पडणार नाही. तरुणांच्या प्रगतीकरता आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याकरता मी प्रयत्न करेन, असा शब्द त्यांनी दिला.
आमदार महेश शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र सभा, मेळावे, गावभेटी सुरू आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ अत्यंत विस्तृत असा असून सर्व ठिकाणी उदयनराजेंना पोहोचावे लागते, तरी देखील रामोशी समाजावरील असलेल्या प्रेमापोटी ते या मेळाव्यासाठी हजर राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच भविष्यात रामोशी समाजाच्या प्रगतीसाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन देखील आ.महेश शिंदे यांनी दिले.
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |

जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |