03:25pm | Jun 10, 2024 |
सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा कारखान्याची उभारणी करून सातारा व आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणले. आज या कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पिक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. यामागे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा हा एकमेव उद्देश आहे. अजिंक्यतारा हा शेतकऱ्यांची सर्वार्थाने काळजी घेणारा एकमेव कारखाना आहे, असे प्रतिपादन माती व पाणी चिकित्सालय कृषी महाविद्यालय पुणे येथील व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी केले.
शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यक्षेत्रातील ६१६ शेतकऱ्यांच्या शेतावर पर्यावरण पूरक खोडवा ऊस व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक राबवण्यात आले. त्यासंदर्भात कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपूरक खोडवा उसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन वाढ या संदर्भात डॉ. फाळके, पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातील कीड व रोग शास्त्रज्ञ डॉ. सूरज नलावडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह सर्व संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.
ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणातील बदल जाणून घेऊन शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. उसाचे उत्पादन कमी होते आणि खर्च वाढतो, अशी ओरड आपण ऐकत असतो. शेतीमध्ये क्रांती घडली तरच देशाची प्रगती होणार आहे. खोडवा ऊस पीक हे काटक असल्याने वातावरणातील ताण तणाव सहजरित्या सहन करते. अनियमित ऊस लागवड, दुर्लक्षित लागवड तंत्रज्ञान, जमिनीचे बिघडलेले आरोग्य याचा सारासार विचार करून असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे. अमर्यादित पाणी वापर कटाक्षाने टाळला पाहिजे. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतच वापरली गेली पाहिजे, असे डॉ. फाळके यांनी सांगितले. ऊस पिकावरील विविध प्रकराची कीड, रोग आणि त्यासाठीचे नियंत्रण, औषध फवारणी तसेच पिकाची घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. सूरज नलावडे यांनी मार्गदर्शन केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |