मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश

पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्वागत

by Team Satara Today | published on : 06 November 2024


कराड : मुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. एका कार्यक्रमात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, आनंदराव घोडके, माजी उपसरपंच शिवाजीराव जमाले, सुषमा जमाले, पांडुरंग जमाले, भीमराव जमाले, शिवाजी जमाले, आण्णासाहेब जमाले, संभाजी जमाले, विकास लोंढे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बडेकर, पूजा जांभळे, आनंदा जमाले, दत्तात्रय माळी, पूनम जमाले, अमजद मुल्ला, प्रल्हाद वाघमारे, सतीश जमाले, अनिकेत चव्हाण, अधिक सावंत, गणेश पवार, दिग्विजय जमाले उपस्थित होते.

दरम्यान आ. चव्हाण यांनी नुरानी मोहल्ला येथेही भेट दिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अफजल बागवान, गणेश पवार, अध्यक्ष आरबाज मोमीन, अदनान बागवान, शाहबाज मोकाशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस !
पुढील बातमी
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या