सातारा : विलासपूर, ता. सातारा येथे घराजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
जागृती उदय कुलकर्णी (वय 35 रा. विरावडे, ता. कराड सध्या रा. शासकीय निवासस्थान वनभवन परिसर विलासपूर गोडोली) असे मृत महिलेचे नाव आहे. दि. 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजता अचानक धाप लागल्याने जागृती कुलकर्णी अत्यवस्थ झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. राहुल साळुंखे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.