सातारा : सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व सातारा कलाध्यापक संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कला उत्सवाचे नियोजन करण्यात आलेले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत जिल्ह्याच्या नावाचा डंका वाजवला.
उत्सवात पारंपारिक लोकसंगीत गायनमध्ये कराडची आर्या जाधव, पाटणचा प्रतिक गुजर, स्वरवाद्य वादनात सातार्याची स्वरा किरपेकर, तालवाद्यवादनात सातार्याची मृण्मयी भूते, चैतन्य पटवर्धन, नाट्य भूमिका अभिनयमध्ये प्रज्ञा कुंभार, सुमंत कचरे, शास्त्रीय नृत्यमध्ये शिरवळची अदिती कुंभार, पारंपारिक लोकनृत्यमध्ये देगावची सिया घाडगे, साताऱ्याचा आयुष खुळे, द्विमित चित्रमध्ये फलटणची प्रेरणा घनवट, सातार्याचा अवधूत देशमाने, त्रिमित चित्र शिल्पमध्ये महाबळेश्वरची रिया कांबळे, पाटखळचा उदय लोहार, खेळणी तयार करणेमध्ये वाइच्या उत्कर्ष शाम नवले यांनी यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कला उत्सवात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सवामध्ये खालील विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय कला उत्सवासाठी निवड झालेली आहे. यात त्रिमित शिल्प उदय लोहार, द्विमितीयचित्र प्रेरणा घनवट, लोकनृत्य- आयुष्य खुळे, ताल वाद्यांमध्ये मृण्मयी भुते, चैतन्य पटवर्धन या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचा सत्कार अनंत इंग्लिश स्कूल,सातारा येथे झाला. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य.डॉ.रामचंद्र कोरडे व शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, चेतना माजगावकर, सुनील झंवर, प्राचार्य श्रीमंत गायकवाड, पर्यवेक्षक अजीज शेख तसेच सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश कुंभार व अविनाश आगलावे यांनी केले. या कला उत्सवासाठी जिल्यातील अनेक कला व संगीत शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कलाशिक्षक सागर सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |