सातारा : रविवार पेठ, सातारा येथून अज्ञाताने रिक्षाची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार पेठेतून अज्ञात चोरट्याने एमएच ११ सीजे १६८७ या क्रमांकाची रिक्षा चोरुन नेली. याप्रकरणी आण्णा शंकर निकम (वय ५७, रा. तामजाईनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.