सातारा : सातारा सिव्हिल हॉस्पिटल मधील मोकळ्या जागेत मोहम्मद राहील तसबीर मियासाहब (वय २९, रा. शिरवळ ता. खंडाळा मूळ रा.उत्तर प्रदेश) हे दि. १५ रोजी रात्री ११ वाजता झोपले असताना अज्ञात व्यक्तीने २० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल त्यांच्या खिशातून चोरी केला. पहाटे ३ वाजता जाग आली तेव्हा मोबाईल जवळ आढळून आला नाही. मोबाईल चोरी झाल्याने याची फिर्याद शहर पोलिसांत करण्यात आली.घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पवार करत आहे.
सिव्हिल परिसरात अज्ञाताकडून २० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरीस
by Team Satara Today | published on : 18 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा