सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 जुलै रोजी रात्री आठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान पोवई नाका परिसरातील राजपुरोहित दुकानासमोरून प्रथमेश मोहन पुरोहित रा. रविवार पेठ, सातारा यांची ज्युपिटर कंपनीची दुचाकी क्र. एमएच 11 डीसी 5481 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.