सातारा : सातारा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढलेला दिसून येत आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ८७ नामनिर्देशन पत्रे उपलब्ध करून देण्यात आली, तर दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी १३३ नामनिर्देशन पत्रे वितरित करण्यात आली आहेत. या दोन दिवसांत एकूण २२० नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे.
नामनिर्देशन प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद पाहता सातारा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.