मुलावरील आरोपा नंतर आईने लावून घेतला गळफास

by Team Satara Today | published on : 21 May 2025


सांगली : सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. कुकटोळी येथे एका तरुणाची पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे ज्या संशयित तरुणाने हा खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याच्या आईने मुलाच्या कृत्यामुळं गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाचा संशयित सुशांत शेजुळ याने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार घडला आहे. या खुनाची बातमी गावात पसरताच संशयित तरुण असणाऱ्या सुशांत शेजुळ याची आईने विमल शेजुळ यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. 

विमल शेजुळ यांना जेव्हा आपल्या मुलावर खूनाचा आरोप आहे हे समजले तेव्हा त्या हादरल्या. आपल्या मुलाने खून केलाय ही बातमीच त्या पचवू शकल्या नाहीत. या धक्क्यातून विमल शेजुळ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे. या सर्व घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत. 

सांगलीमध्ये एका पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अनिता सीताराम काटकर असं मृत महिलेचे नाव आहे. शहरातील शिंदे मळा येथील कुरणे गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून घरगुती वादातून पती सिताराम काटकर याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खुनाच्या घटनेनंतर पती सिताराम काटकर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पहाटे साडे पाचच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर संजयनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनंत इंग्लिश स्कूलमध्ये AI मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डिझाइन समर कॅम्प यशस्वीरित्या पार
पुढील बातमी
पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न

संबंधित बातम्या