सातारा : येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून अज्ञात चोरट्याने नर्सच्या 36 हजारांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हील हॉस्पिटलमधून अज्ञात चोरट्याने ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. दोन तोळ्याच्या दोन बांगड्या, कानातले वेडणे, सोन्याचे पान व चांदीचे कॉईन असा मुद्देमाल चोरी झाला आहे. ही घटना दि. २५ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सुमन संदीप कोरडे (वय ४९, रा. जरंडेश्वर फाटा, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार या नर्स असून सॅकमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने ठेवले होते. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.