भारतीय स्वयंपाक घरात डाळ ही असतेच. डाळीशिवाय जेवणाला चवच लागत नाही. भातासोबत डाळ नसेल तर भात खाल्यासारखा वाटतं नाही. त्यामुळे रोजच्या आहारात डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. डाळ बनवण्याची प्रत्येक व्यक्तीची वेगळी पद्धत आहे. काहींना फोडणीचं वरण लागत तर काहींना फोडणी न देता बनवलेलं साधं वरण खाण्याची सवय असते. मात्र अनेकदा तुम्ही पाहिलं असेलडाळ शिजवताना डाळीवर फेस येतो. पण हा फेस आरोग्यासाठी चांगला आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. मग चला जाऊन घेऊया सविस्तर माहिती.
डाळ कुकरमध्ये किंवा टोपात शिजवल्यानंतर डाळीवर फेस येऊ लागतो. या फेसला सॅपोनिन असे म्हणतात. पण हा फेस खरंच आरोग्यासाठी चांगला आहे का? डाळीवर येणारा फेस हा नैसर्गिक पदार्थ असून सर्व डाळी किंवा कडधान्य शिजवताना येतो. हा फेस बीन्स आणि वनस्पतींना रक्षण देण्याचे काम करतो. पण डाळ शिजवताना डाळीवर येणारा पांढरा फेस आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. या फेसचे सेवन केल्यामुळे आरोग्याला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा डाळ शिजवताना त्यात आलेला फेस काढून टाकला जातो.
प्युरीन:
डाळ शिजवताना डाळीवर येणाऱ्या फेस मध्ये प्युरीन नावाचा घटक आढळून येतो. यामुळे शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरामध्ये युरिक ऍसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्य आणि किडनी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका किंवा संधिवात होऊ शकतो. शरीरात जमा झालेले युरिक ऍसिड आरोग्यसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे डाळीवर येणाऱ्या फेसाचे सेवन करू नये.
सेपॉनिन:
फेसमध्ये सेपॉनिन नावाचा घटक आढळून येतो. हे एक नैसर्गिकरित्या उद्भवणारे संयुगं आहे. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे डाळीमध्ये आलेला फेस डाळ शिवजतांना काढून टाकावा. अन्यथा पोट दुखी किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.
प्रोटीन बाहेर पडून जातात:
डाळीवर आलेल्या फेसाचे चुकूनही सेवन करू नका. यामुळे डाळींमधील प्रोटीन कमी होऊन जाते. डाळींमधील प्रोटीनची पातळी कमी झाल्यानंतर डाळीला व्यवस्थित चव लागत नाही. डाळीमध्ये आढळून येणाऱ्या सॅपोनिनमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रोटीन असते. शिवाय इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
