सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणारी 21 वर्षीय युवती दि. 20 रोजी राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस हवालदार बोराटे तपास करत आहेत.