कोल्हापूर : दक्षिण अमेरिकेच्या जलाशयात अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका भागविणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. यापूर्वी उजनी धरण आणि कृष्णा नदीपात्रात या माशाचे अस्तित्व आढळले होते.
येथील सुनील जाधव, अनिल जाधव आणि कृष्णात सातपुते मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांना कासारी नदीत मासेमारी करताना जाळ्यात वेगळ्या प्रकारचा सकर मासा सापडला. त्यांच्याबाबत काहीच माहीत नसल्याने त्यांनी त्याला पाण्याच्या टाकीत सुरक्षित ठेवले आहे.
हा मासा दक्षिण अमेरिकेतील आहे. फिश टँकमधील शोभीवंत म्हणून या माशाला पाळले जाते. कालांतराने त्याच्या आकारामुळे त्याला सांभाळणे शक्य नसल्याने लोक त्याला जवळपासच्या नैसर्गिक अधिवासातील तलाव, नदीत सोडतात. परंतु, हेच कृत्य तेथील अधिवासाला घातक ठरत आहे. कारण हा मासा त्या अधिवासामध्ये सापडणाऱ्या प्रदेशनिष्ठ माशांची अंडी व त्यांच्या लहान पिलांना भक्ष्य बनवतो आणि आपली संख्या वाढवतो.
भारतातील अनेक जलाशयांमध्ये परदेशी माशांनी अस्तित्व निर्माण केले आहे. यांच्यामुळे तेथील जलसंपदा नष्ट होत आहे. कठोर कवचांनी बनलेल्या शरीरयष्टीमुळे हा मासा खात नाहीत. अशा प्रकारच्या माशांच्या जाती छंदापोटी पाळतात आणि आकारामुळे पाळणे शक्य नसल्याने नद्या, तलावांमध्ये सोडल्याने मत्स्य प्रजातींसाठी बाधक ठरत आहेत.
याच प्रकारचा जेवणामध्ये वापरला जाणारा तिलाप मासा सकर माशाप्रमाणे बाहेरच्या आफ्रिकेतून माणसांच्या हौसेसाठी आणला गेला. चांगल्या चवीमुळे लोकांनी त्याला स्वीकारले. तिलाप मासा नदी, तलावामधील देशी माशांना भक्ष्य बनवून जगत असून, त्यांची प्रजात वाढताना दिसत आहे. विदेशी माशांना पसंती देणे टाळावे. त्याचबरोबर त्यांना अशा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडू नये जेणेकरून आपली जैवविविधता अबाधित राहील.
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |