'अजिंक्यतारा'चे शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २४ शेतकऱ्यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे येथे होणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून हे शेतकरी नुकतेच प्रशिक्षणासाठी रवाना झाले. 

प्रती एकरी ऊस उत्पादन खर्च कमी व्हावा, ऊस उत्पादन वाढावे या करिता दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार २४ शेतकरी प्रशिक्षण घेणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थान, रोग व किड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन तसेच नवीन ऊस जातीची माहिती, बियाणे मळा याचे प्रत्यक्ष प्लॉटवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबीराचा लाभ प्रशिक्षणात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना होणार आहेच आणि या शेतकऱ्यांच्यामार्फत गांवा-गावातील इतर शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. प्रशिक्षणासाठी रवाना होणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक वसंत पवार, भास्कर घोरपडे, बजरंग जाधव, राजेंद्र घोरपडे, अशोक कुराडे, सुनिल निकम, नितीन पाटील तसेच मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, शेती व ऊस विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुढील बातमी
ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

संबंधित बातम्या