सातारा : तुमचे सोन्याचे मंगळसूत्र द्या. त्याबदल्यात सोन्याची विट देतो, असे सांगून सातार्यात महिलेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शालन भिमराव भिलारे (वय 57, रा. पंताचा गोट, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 जून रोजी प्रकाश लॉज समोर घडली आहे. संशयित आरोपींनी महिलेचे 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र घेतले. मात्र त्या बदल्यात सोन्याची विट दिली नाही. फसवणूक झाल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक पवार करीत आहेत.