सातारा : सातारा शहरात विनापरवाना फ्लेक्स लावल्या प्रकरणी सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करीत सुमारे दीडशे फ्लेक्स जप्त केले आहेत. तसेच संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील शाहूनगर, विलासपूर, गोडोली येथे रस्त्यालगत विद्युत खांबावर विना परवाना फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी देवकर क्लासेस ऍन्ड अकेडमी (कामाठीपुरा), श्रीकांत उर्फ अविनाश पवार (रा.पंताचा गोट, सातारा), गायडन्स पॉईंट कोचिंग क्लासेस (पोवई नाका परिसर), दिशा अकॅडमी (पोवई नाका परिसर) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत सुमारे दीडशे फ्लेक्स जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी नगरपालिकेचे अधिकारी प्रशांत निकम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.