सातारा : येथील गेंडामाळ शाहूपुरी परिसरातील श्री गेंडामाळ दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त दोन दिवशीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्तयाग संपन्न होणार आहे. तसेच दुपारी तीन ते चार या वेळेतमार्तंड महिला भजनी मंडळ शाहुपुरी याची भजन सेवा तसेच सायंकाळी पाच ते सहा या वेळेतओंकार भजनी मंडळ, शाहुपुरी यांची भजन सेवा होणार आहे.
दत्त जयंती दिवशी शनिवार दि. 14 रोजी सकाळी 8 ते 10.30 या वेळेतश्रींची षौडशोपचार पुजा, अभिषेक, नैवेद्य, आरती दुपारी तीन ते चार या वेळेत स्तोत्र पठण, रामकृष्ण मंडळ शाहुपुरी, सातारा यांच्या भगिनी वर्ग करणार असूनसायंकाळी 5 वाजता जन्मकाळ किर्तन व जन्मकाळ सौ. मंजुषा बाजी, शाहुपुरी सातारा या सादर करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना सातारकर दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कासट यांनी आवाहन केले आहे.