वरकुटे मलवडी : काळचौंडी ता.माण येथील सौ.आशाताई किसन खरात हिस टँक्टर खरेदीसाठी माहेर कडून पैसे घेऊन ये म्हणून शारिरीक त्रास देवून मारहाण करून विहरीत आत्महत्या करणेस प्रवृत्तकेल्याप्रकरणी काळचौंडी ता.माण येथील हंडेवस्ती या ठिकाणी राहणारे पती किसन सर्जेराव खरात, सासरा सर्जेराव रामू खरात,सासु जगुबाई सर्जेराव खरात यांच्यावर दि.२/१२/२०१८ रोजी गुन्हा दाखल करून त्यांना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बनगरवाडी ता.माण येथील प्रल्हाद रंगनाथ बनगर यांची मुलगी आशाताई हिचा विवाह ३०/१०/२००८ रोजी काळचौंडी येथील हंडेवस्तीला राहणारे किसन सर्जेराव खरात यांच्याशी झाला होता. पाच वर्षे त्यांचा संसार सुरळीतपणे चांगला चालला होता.त्यानंतर आशाचा पती किसन सर्जेराव खरात यांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मयत सौ.आशा हिने माहेरच्या नातेवाईकांना सांगितले होते.तसेच माझा नवरा मला ट्रँक्टर खरेदीसाठी तसेच संबंधित महिलेशी असणाऱ्या संबंधामुळे मला त्रास देवून मारहाण करतो असे अनेकवेळा सांगितले होते.परी आई वडिलांनी अनेकवेळा समजावून सांगून तिला नांदावयास पाठवले होते. मयत आशा हिस मुलगा कृष्णा वय ७ वर्षे व मुलगी खुशी वय ६ वर्षे अशी दोन अपत्ये आहेत. नवरा किसन,सासरा सर्जेराव, सासु जगुबाई यांचा त्रास असाह्य झाल्याने दि.२९/११/२०१८ रोजी काळचौंडी गावच्या हद्दीतील विहरीत उडी घेवून आत्महत्या केली. मयत आशाताई खरात हिचा भाऊ नितीन प्रल्हाद बनगर याने म्हसवड पोलीसांत सबंधित संशयित आरोपी विरोधात लेखी तक्रार दिल्यानंतर पती,सासू,सासरा या तिघांच्या विरोधात म्हसवड पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून, म्हसवड पोलिसांनी आशाताई हिस आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तातडीने अटक केली आहे. अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख करीत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |