सातारा : मद्यपी कारचालकाने पंढरपूर कडून साताऱ्याकडे येताना काल रात्री चांगलाच धुमाकूळ घातला. उपरी (जि सोलापूर) पासून सुरू झालेली मालिका गोंदवल्यातील सतर्क नागरिकांमुळे संपल्याने पुढील अनर्थ टळला. या थरारात मद्यपी चालक हणमंत गेजगे यांने तेरा जणांना ठोकरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काल दि . १९ रोजीरात्री आठच्या सुमारास गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथील मुख्य रस्त्यावर सामसूम होत चालली असतानाच अचानक मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भास्कर कट्टे यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधून एक चारचाकी वाहन रस्त्याने वाहनांना ठोकरत येत असल्याबाबतची माहिती दिली. यावेळी गोंदवल्यातील नागरिकांमध्ये ही बातमी समजताच भरधाव वेगाने अपघात करत निघालेल्या वाहनाला अडविण्यासाठीची धावपळ सुरू झाली.अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला. हे अपघाताला कारणीभूत असणारे वाहन थांबविण्यासाठी सातारा पंढरपूर या मुख्य रस्त्यावरच धैर्यशील पाटील यांनी स्वतःचा डंपर आडवा उभा केला.काही मिनिटातच एम एच ११ सी जी ३६६० ही पांढऱ्या रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली.त्याचक्षणी तातडीने ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे मद्यपी चालकाला गाडी थांबविण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे चालक गेजगे याने गाडी थांबविताच लोकांनी गाडीभोवती गराडा घातला. परंतु गाडीची दारे व काचा बंद असल्याने व वाहन सुरूच असल्याने धोका अधिकच वाढला होता. मात्र याचवेळी मोठ्या धाडसाने धैर्यशील पाटील यांनी गाडीच्या वर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली.चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला.याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीस देखील घटनास्थळी पोचले.लोकांनी या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.या अपघात करत आलेल्या वाहनाचा म्हसवडमधूनच बंटी माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील पाठलाग सुरू केला होता.मात्र गोंदवल्यात हे वाहन थांबविल्यानंतर त्यांचाही पाठलाग थांबला.
दरम्यान या वाहनाने विरकरवाडी(ता.माण)येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी संपूर्ण प्रवासादरम्यान आणखी किती जणांना अपघातग्रस्त केले आहे याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नव्हती.म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.या थरारक पाठलागात म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण,सुरज काकडे,संजय अस्वले,अनिल वाघमोडे सहभागी झाली होते.गोंदवल्यात या थरारक वाहनाबाबत माहिती समजताच लोकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |