दहिवडी : सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर देवस्थामध्ये देवस्थानची पुजाअर्चा करणार्या बडवे यांनी दक्षिणापेटी फोडून चोरी केली असल्याची तक्रार दस्तुरखुद्द खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, बडवे यांच्यावर तक्रारीत संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, शिखर शिंगणापूर हे माण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील मोठे देवस्थान आहे. शंभु महादेवाचे मंदीराची सध्या काही बडवे देखभाल करत आहेत. मात्र दि. 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेनउ ते दि. 27 ऑगस्ट रोजीच्या पहाटेदरम्यान मंदीरात चोरी झाली. दक्षिणापेटी फोडून त्यातील रोकड चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
शिखर शिंगणापूर या देवस्थानची मालकी सध्या खा.उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. चोरीबाबतची त्यांना माहिती मिळाल्यानंतर नुकतेच त्यांनी जावून घटनेची माहिती घेतली. घटनेची सर्व माहिती घेतल्यानंतर खा.उदयनराजे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दाखल केला. तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अखेर शिखर शिंगणापूर देवस्थानमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला. संशयित चोरट्यांमध्ये मंदीरातील बडवे (संपूर्ण नाव, वय, पत्ता माहित नसल्याचे म्हटले आहे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरीमध्ये नेमकी, रोकड, इतर ऐवजाबाबतचा उल्लेख केलेला नाही. सोमवारी याबाबतच्या घडामोडी घडल्यानंतर मंगळवारी दिवसभर याबाबत शिखर शिंगणापूर, दहिवडी येथे चर्चा सुरु होती.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |