11:47am | May 06, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दि. ०४ मे २०२४ हा दिवस मतदार गृहभेट दिवस म्हणून सातारा स्वीप कक्षाकडून राबविण्यात आला. आजच्या दिवशी जिल्हयामध्ये मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ यांचे निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा व्यापक जनसंपर्क पाहता विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने जिल्हयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व अधिनस्त सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांची जिल्हयात एकाच दिवशी २००० पथकांची नियुक्ती करुन मतदार यादीनिहाय १००% कुटुंबापर्यंत पोहचून जनजागृती करण्याच्या उद्देश्याने १लाख कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. यावेळी मतदानाचे महत्व सांगण्यात आले तसेच मतदारांना मतदाना दिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचारी यांना सूचना केल्या.
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना तालुका निहाय भेटी देण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी नेमूण दिलेल्या तालुक्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष गृहभेटी करुन मतदान जनजागृती बाबत आवाहन केले.
तसेच सातारा जिल्हा परिषदेमार्फत गावातील ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांना गावातील गृहभेटी साठी दि.३ ते ७ मे पर्यंत दिवसातून ३ वेळा गावातील मतदारांच्या कुटुंबांना भेटी देऊन १०० % मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी कार्यरत राहणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांच्या मदतीसाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, बचतगट ग्रामसंघ यांचा समावेश असेल.
मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ यांनी दि.४ मे २०२४ रोजी मतदान जनजागृतीसाठी सातारा एमआयडीसी येथील कुपर कंपनी व टॉप गिअर कंपनीमधील कर्मचारी यांना मतदानाचे महत्व सांगून सर्वांनी आपल्या कुटंब व नातेवाईकांसह १०० % मतदान करण्याबाबत आवाहन केले. सातारा स्वीप कक्षामार्फत एमआयडीसी कंपनीतील कामगारांना मतदान जनजागृतीचे पोस्टरचे वाटप करण्यात आले. सदर जनजागृती कार्यक्रमावेळी निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), अर्चना वाघमळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ,श्रीमती रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( बा.क.), सतिश बुध्दे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सातारा, रविंद्र खंदारे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सातारा, तेजस गमरे, उपशिक्षणाधिकारी ( माध्य.) तसेच सातारा जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जि.प.सातारा यांनी उपस्थित कामगारांना मतदानाची शपथ दिली.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |