09:31pm | May 06, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यात 7 मे रोजी 2315 मतदान केंद्रावर अठरा लाख 89 हजार,740 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून खर्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा करणार आहे. नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून मतदानाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात 18 लाख 89 हजार 740 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 9 लाख 59 हजार 17 पुरुष, 9 लाख 30 हजार 647 स्त्रिया व 76 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. महाबळेश्वर, वाई, खंडाळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3 लाख 41 हजार 714 मतदार आहेत.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एका पथकास दोन बीयू, व्हीव्हीपॅट मशीन, मतदार यादी, मतपत्रिका 32 प्रकारचे साहित्य असलेली बॅग देण्यात येणार आहे. तसेच 463 शाई बाटल्या, 46 हजार 300 मतदार पत्रिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 156 पथके स्थापन करण्यात आली आहेत. संबंधित वाहनांना जीपीएस प्रणाली आहे. या पथकांकडून उमेदवार, राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच निवडणूक काळात मतदारांना पैसे दारू व इतर वस्तूंचे वाटप करून मतदारांना प्रभावीत करू नये यासाठी ही पथके तैनात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात 2315 मतदान केंद्रे आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून येण्यासाठी 118 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच 17 मतदान केंद्रे ही विशिष्ट संकल्पनेवर आधारित असून ती मतदारांच्या आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.
नागरिकांनी सकाळी सात ते सहा या वेळेत निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी 16 हजार 800 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचार्यांना विविध टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान टक्का वाढवण्यासाठी 1500 पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये 8 हजार 500 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर मंडप उभारणी उन्हाच्या झळा टाळण्यासाठी करण्यात आली आहे. पंख्याची व्यवस्था तसेच मोबाईल हेल्थ पथक, हेल्थ वर्कर यांची सोय करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर लांब रांगा असतील तर मतदानासाठी खुर्च्यांची सोय सुद्धा करण्यात आली आहे. प्रत्येक 50 घरामागे एक अधिकारी नेमण्यात आला असून हे अधिकारी घरोघरी शंभर टक्के मतदान करा, असे आवाहन करणार आहेत.
सातारा जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे. जिल्ह्यात 12 हजार 800 सैनिक कार्यरत असून ते पोस्ट मतदार आहेत. सैनिक त्यांच्या कमांडिंग ऑफिसर समोर गोपनीयता राखून पोस्टाने मतदान पाठवणार आहेत. सवाई माधवपुर राजस्थान येथे देशात सर्वाधिक पोस्टल मतदार आहेत. जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली होती. जिल्ह्यात सुमारे 50 हजार युवा मतदार आहेत. राज्यात सर्वाधिक तरुण मतदार सातारा जिल्ह्यात आहेत. हे युवा मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |