09:32pm | May 06, 2024 |
सातारा : राजकीय दबावातून धोम डाव्या कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानक थांबवण्यात आल्याने कोरेगाव तालुक्यातील सात गावांनी 7 मे रोजी होणार्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
कराड उत्तर मतदारसंघातील सुरली, जयपुर, पिंपरी, रहिमतपूर,अंभेरी, साप, कण्हेरखेड, बोरीव, अपशिंगे, वाठार या गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय जाहीर केला असून याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला मतदानाच्या पूर्वसंध्येला सादर करण्यात आले. या इशार्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यात मंगळवार दि. 7 मे रोजी जिल्ह्यातील अठरा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे आणि मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान करावे, असे आवाहनही केले आहे. एकीकडे मतदानाच्या टक्केवारीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा खळबळजनक ठरला आहे.
धोम कालवा संघर्ष समितीचे प्रमुख नंदकुमार माने आणि सुमारे 100 ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन याबाबतचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
या संघर्षाबाबत बोलताना नंदकुमार माने म्हणाले, धोम धरणाच्या नियमित पाणी आवर्तनासाठी गेले सात महिने नऊ गावांचा संघर्ष सुरू आहे. 29 एप्रिल 2024 रोजी कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही उपोषण केले होते. मात्र राजकीय दबावातून कोरेगावचे आमदार महेश शिंदे धोम डाव्या कालव्याचे पाणी जाणीवपूर्वक बंद करत आहेत. धोम डावा कालवा उन्हाळी आवर्तन नियमित सुरू असताना दोन महिने पाणी आलेले नाही. आमदार शिंदे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकार्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी केला.
या नऊ गावांमध्ये धोम डाव्या कालव्याला पाणी नसल्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. ही सर्व गावे कराड उत्तर मतदारसंघांमध्ये येत आहेत कराड उत्तर मतदार संघाच्या नऊ गावातील हक्काचे एक एटीएमसी पाणी हे जाणीवपूर्वक कोरेगाव मतदारसंघातील गावांसाठी पळवले जात आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
आमच्या पाण्याच्या मागणीचा हा संवेदनशील प्रश्न प्रशासन व राजकीय पातळीवर अद्यापही प्रलंबित आहे. हा प्रश्न न सुटल्यास दि.7 मे रोजी होणार्या मतदान प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार घालणार असल्याचा इशारा धोम संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या नऊ गावांमध्ये 30 हजार मतदान आहे. त्यामुळे पाणी सोडा आणि मत घ्या, अशी थेट भूमिका संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी मांडली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी ग्रामस्थांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रश्नासंदर्भात संवेदनशीलपणे बैठक लावून त्या प्रश्नाचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |