09:02pm | May 05, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडी यांच्यासह 16 उमेदवारांमध्ये रंगलेल्या प्रचाराची रविवारी सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी मेढा येथे, तर आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील मतदार संघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रचाराची सांगता केली. प्रशासन 7 मे रोजी होणार्या मतदान प्रक्रियेसाठी ऍक्टिव्ह मोडवर आले आहे.
गेल्या पंधरवड्यापासून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यामुळे राजकीय पारा प्रचंड वाढला होता. त्यात उन्हाच्या तीव्र झळा असतानाही दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी सातारा जिल्हा टप्प्याटप्प्याने पिंजून काढत प्रचार शिगेला पोहोचवला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व महायुतीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या सभा सातारा जिल्ह्यात पार पडल्या. त्यामुळे एक चुरशीचे वातावरण तयार झाले आहे. दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनी औद्योगिक विकास आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सुविधा अशा विविध मुद्द्यांवर भर देत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे. सायंकाळी पाच वाजता सातारा जिल्ह्यातील प्रचाराची सांगता झाली.
येत्या 7 मे रोजी जिल्ह्यातील 18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. सर्व उमेदवारांनी सायंकाळी पाच वाजता प्रचार रॅली सर्वांचे सत्र तातडीने थांबवावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने तीन टप्प्यांमध्ये 11 हजार कर्मचार्यांचे प्रशिक्षण सत्र पूर्ण केले असून सर्व मतदान यंत्रे सज्ज ठेवली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अधिकारी, सहाय्यक केंद्राध्यक्ष, तीन मतदानाधिकारी शिवाय प्रत्येक केंद्रावर 25 पोलिसांचा ताफा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सर्व तयारीचा आढावा शनिवारीच घेतला.
सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून तीन टप्प्यांमध्ये कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा आगाराच्या सुमारे 278 बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये या साहित्याचे वाटप होणार असून 7 मे च्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
सातारा जिल्हा पोलिसांचा सुमारे 2000 पोलिसांचा बंदोबस्त सातारा लोकसभा मतदारसंघातील ठिकाणी उपलब्ध राहणार आहे यामध्ये सीआरपीएफची एक तुकडी, जलद प्रतिसाद पथक तसेच बीडीडीएस व होमगार्डच्या दोन तुकड्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या बंदोबस्तासाठी दोन उपअधीक्षक आणि अकरा पोलीस निरीक्षक व बाराशे कर्मचार्यांचा बंदोबस्त उपलब्ध करण्यात आला आहे.
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |