10:05pm | Apr 19, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांची संपत्ती अब्जावधीची असून तेच उमेदवारांमध्ये श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची स्थावर व जंगम मालमत्ता 251 कोटी 82 लाख 50 हजार रुपयांची आहे.
उदयनराजे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, जनता सहकारी बँक, कराड अर्बन बँक, एसबीआय, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआय या बँकांमध्ये 4 कोटी 9 लाख 26 हजार 240 रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी विविध बँका शेअर्स आणि बिटकॉइन मध्ये एक कोटी तीन लाख 74 हजार 140 रुपयांची गुंतवणूक केली आहे.
उदयनराजे भोसले यांच्याकडे आलिशान वाहने असून त्यामध्ये जिप्सी, ऑडी, मर्सिडीज बेंझ, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, बीएमडब्ल्यू या वाहनांचा समावेश आहे. तसेच ट्रॅक्टरसह या वाहनांची किंमत सुमारे दोन कोटी दहा लाख पाच हजार इतकी आहे.
उदयनराजे यांच्याकडे कोट्यवधीचे जडजवाहीर आहेत. त्यांच्याकडे 43 किलो 296 ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असून त्याची किंमत 3 कोटी 46 लाख 31 हजार 169 इतकी आहे. उदयनराजे भोसले यांच्यावर अंदाजे दोन कोटी 44 लाख 63 हजार 842 इतके कर्ज आहे.
त्यांनी सेंट पीटर्स स्कूल पाचगणी येथे दहावीपर्यंतचे, तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
उदयनराजे यांची सातारा, गोडोली, कोडोली, धनगरवाडी, सोनगाव, पेट्री नवी, लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे शेकडो एकर जमीन व दुकान गाळे आहेत. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर पुणे येथे फ्लॅट्स आहेत. खासदार उदयनराजे यांची स्थावर मालमत्ता 20 कोटी 55 लाख 51 हजार 394 रुपयांची असून जंगम मालमत्ता दोन कोटी 90 लाख 35 हजार 645 रुपये इतकी आहे. स्वसंपादीत मालमत्ता 28 कोटी 4 लाख 66 हजार 670 रुपये आहे, तर वारसा प्राप्त मालमत्ता 174 कोटी 52 लाख 15 हजार 877 इतकी आहे.
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |