पुणे : दक्षणा फाउंडेशन मधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या परराज्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना (दि. २० रोजी ) घडली आहे. ४ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असून २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. २२ मुले आणि ७ मुली असे २९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
कडूस परिसरात दक्षणा फाउंडेशन ही गैरसरकारी व सेवाभावी संस्था आहे. ही संस्था ग्रामीण भागातील अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. राज्यभरातून गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या येथे सुमारे तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. १९) रात्री पासून अन्नातून विषबाधा झाल्याने जुलाब, डोकेदुखी, मळमळ व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना अधिक त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना काही वेळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यादेखील प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जनरल विभागात हलविण्यात आले. या विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. कौस्तुभ गरड, डॉ. मयुरी मालाविया, अल्ताफ पठाण यांनी उपचार केले. रुग्णालयात तहसीलदार प्रशांत बेंडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |