08:07pm | Apr 23, 2024 |
सातारा : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली आहे.
आत्ताची परिस्थिती पाहता, उन्हाचा तडाखा वाढला असून उष्माघाताने अनेक नागरिकांना खूपच त्रास होत आहे. अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. सातारा लोकसभेची मतदानाची तारीख 7 मे आहे आणि मतदानाच्या तारखेपर्यंत उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता असून, दुपारच्या वेळी मतदार, मतदान करण्यासाठी बाहेर पडतील याची शक्यता नाही. यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी मतदानाची वेळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच उष्माघातापासून वाचण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर, प्रथमोपचार पेटी, छत्र्या, पिण्याच्या पाण्याच्या थंड बाटल्या किंवा मोठे जार आणि ग्लास तसेच ओ आर एस ची पाकिटे यांची व्यवस्था करावी, प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचारा साठी तज्ञ किंवा शिकावू डॉक्टरची व्यवस्था करावी, मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये यासाठी तात्पुरत्या तंबू ची, मंडपाची व्यवस्था करावी आणि मतदान केंद्राच्या गेट पासून मतदान केंद्राच्या खोलीपर्यंत कारपेट टाकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सुद्धा भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली.
निवेदन देताना भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे उपस्थित होते.
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |