सातारा : सातारा शहरातील सेव्हन स्टार बिल्डींग येथे दोन कॅफेमध्ये, तर विसावा नाका येथील एका कॅफेमध्ये अश्लील चाळे केल्याप्रकरणी मालकासह एकूण 9 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव जोतीराम साळुंखे (वय 21, रा. कामाठीपुरा, सातारा), संग्राम हरिश्चंद्र दणाणे (वय 28, रा. गुरुवार पेठ, सातारा) हा कॅफे चालक व अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस सागर गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई 17 एप्रिल रोजी ड्रिम कॅफे येथे करण्यात आली आहे. यातील संग्राम दणाणे याने बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेर्यापासून दूर ठेवली आहे. कॅफेमध्ये अंधार ठेवणे. कॅफेमध्ये रजिस्टर नोंदणी नसल्याचे समोर येवून कॅफेत अश्लील चाळे होत असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
दुसरी कारवाई सेव्हन स्टार बिल्डींग येथेच करण्यात आली आहे. याप्रकरणी यश किरण निकम (वय 20, रा.शिवथर ता.सातारा), जयदीप नलवडे (रा.वाढे ता.सातारा) व अनोळखी महिला यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस इरफान मुलाणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 17 रोजी ही कारवाई स्वीट कपल कॅफे येथे करण्यात आली आहे. या कॅफेतही बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेर्यापासून दूर करण्यात आली आहे. दरवाजे अपारदर्शक ठेवून अंधार करण्यात आला आहे. कॅफेमध्ये नोंदणी रजिस्टरही न ठेवता त्याठिकाणी अश्लील चाळे करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, यातील यश निकम हा कॅफे चालक आहे.
तिसरी कारवाई विसावा नाका येथील हार्ट बीट कॅफेमध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी गणेश सतीश जाधव (वय 27, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), मानतेश मारुती जानी (वय 36, रा. कोयना सोसायटी, सातारा) व महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील गणेश जाधव हा कॅफे चालक आहे. पोलीस संतोष घाडगे यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई 17 एप्रिल रोजी करण्यात आली आहे. बैठक व्यवस्था सीसीटीव्हीच्या कक्षेत न ठेवता अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |