10:24pm | Apr 19, 2024 |
सातारा : सातार्यातील पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान महायुतीच्या निघालेल्या रॅलीदरम्यान चोरट्यांनी हाथ की सफाई केले असल्याचे समोर आले आहे. माजी खासदार अमर साबळे यांच्या खिशातील रोख 12 हजार रुपये व इतर कागदपत्रांची चोरी झाली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
माजी खासदार अमर शंकर साबळे (वय 61, रा. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 18 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून खा.उदयनराजे भोसले यांना उमेदवारी झाल्यानंतर दि. 18 एप्रिल रोजी सातार्यात त्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गांधी मैदान ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली होती.
पोवई नाका येथे भाजपची रॅली आल्यानंतर त्याठिकाणी अनेक मान्यवर आले. यामध्ये माजी खासदार अमर साबळे हे देखील होते. पोवई नाका येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जात असताना गर्दी होती. गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञाताने त्यांच्या खिशातील रोख 12 हजार रुपये चोरले. याशिवाय पाकीटामध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, व्हीजीटींग कार्ड, हेल्थकार्ड, चार बँकांचे चेक अशी कागदपत्रेही त्या पाकीटात होती. चोरीची घटना समोर आल्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांची तक्रार घेवून तक्रारीवरुन अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |