02:39pm | Apr 30, 2024 |
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजनाथ सिंह यांनी लखनऊमधून उमेदवारी अर्ज भरला. भाजपाने त्यांना सलग तिसऱ्यांदा या जागेवरून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, राजनाथ सिंह यांच्याकडे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांच्याकडे ७५,००० रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ४५,००० रुपये रोख आहेत. बँक ठेवींबद्दल बोलायचे तर राजनाथ सिंह यांच्या लखनौ आणि दिल्लीतील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३,११,३२,९६२ रुपये जमा आहेत. तसेच, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ९०,७१,०७४ रुपये जमा आहेत.
राजनाथ सिंह यांनी कोणत्याही शेअर्स किंवा बाँडमध्ये पैसे गुंतवलेले नाहीत किंवा त्यांनी कोणत्याही बचत योजनेत गुंतवणूक केलेली नाही. मात्र, त्यांच्या पत्नीने पोस्ट ऑफिस खात्यात ६.५१ लाख रुपये गुंतवले आहेत. राजनाथ सिंह यांच्याकडे ६० ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत ४.२० लाख रुपये आहे. तसेच, त्यांच्याकडे ४ लाख रुपयांची अनेक मौल्यवान वस्तू आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नीकडे ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत ५२,५०,००० रुपये आहे. त्यांच्याकडे १२.५ किलो चांदी आहे, ज्याची किंमत ९,३७,५०० रुपये आहे.
याचबरोबर, राजनाथ सिंह यांच्या संपत्तीत शस्त्रांचाही समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३२ बोरची रिव्हॉल्व्हर असून तिची किंमत दहा हजार रुपये आहे. तसेच, एक बंदूकही त्यांच्याकडे आहे. या बंदुकीची किंमत १०,००० रुपये आहे. स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे झाले तर राजनाथ सिंह यांच्या नावावर १.४७ कोटी रुपयांची शेतजमीन आहे, तर लखनऊमध्ये त्यांच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत १.८७ लाखांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची संपत्ती असूनही राजनाथ सिंह यांच्या नावावर एकही कार नाही.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |