06:54pm | Apr 22, 2024 |
सातारा : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता सोळा उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणूकीत थेट लढत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यातच होणार आहे. शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी छाननीमध्ये तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २१ उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले होते.यापैकी शनिवारी विठ्ठल सखाराम कदम(अपक्ष) यांनी अर्ज माघार घेतला होता.तर आज सोमवारी दादासाहेब वसंतराव ओव्हाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), दिलीप हरिभाऊ बर्गे (भारतीय जवान किसान पार्टी), सागर शरद भिसे (अपक्ष) आणि चंद्रकांत जानू कांबळे (अपक्ष) या चार जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. अशा एकुण पाच उमेदवारांनी आजच्या अंतिम दिवसाअखेर अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान माघारी प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
उमेदवार आणि त्यांना मिळालेले चिन्ह खालीलप्रमाणे -
१) आनंद रमेश थोरवडे (बहुजन समाज पार्टी) चिन्ह – हत्ती
२) श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले (भारतीय जनता पार्टी) चिन्ह – कमळ
३) शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष. चिन्ह – तुतारी वाजवणारा माणूस
४) प्रशांत रघुनाथ कदम (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह – प्रेशर कुकर
५) तुषार विजय मोतलिंग (बहुजन मुक्ति पार्टी) चिन्ह – खाट
६) सयाजी गणपत वाघमारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) चिन्ह – शिट्टी
७) डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष) चिन्ह – कपाट
८) सुरेशराव दिनकर कोरडे (अपक्ष) चिन्ह – ऑटो रिक्षा
९) संजय कोंडीबा गाडे (अपक्ष) चिन्ह – तुतारी
१०) निवृत्ती केरु शिंदे (अपक्ष) चिन्ह – चालण्याची काठी
११) प्रतिभा शेलार (अपक्ष) चिन्ह – गॅस सिलेंडर
१२) सदाशिव साहेबराव बागल (अपक्ष) चिन्ह – दूरदर्शन
१३) मारुती धोंडीराम जानकर (अपक्ष) चिन्ह – हिरा
१४) विश्वजीत पाटील-उंडाळकर (अपक्ष) चिन्ह – बॅट
१५) सचिन सुभाष महाजन (अपक्ष) चिन्ह – फुगा
१६) सीमा सुनिल पोतदार (अपक्ष) चिन्ह – बॅटरी टॉर्च
अशा प्रकारे वरील १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. दरम्यान, एका ईव्हीएम मशीनवर १५ उमेदवार व एक नोटा असे १६ नावांची मर्यादा असल्याने फक्त नोटा या पर्यायासाठी दुसरी ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर वाढली आहे. त्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने मायक्रो प्लॅन करुन चोख तयारी केेली असून ७ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |