02:53pm | Apr 23, 2024 |
सातारा : बजरंग बली की जय, जय श्रीराम, जय हनुमान.. चा जयघोष करत आज श्रीराम भक्तांनी श्रीरामाचा भक्त असणाऱ्या श्री बजरंग बली अर्थात पवनपुत्र हनुमानचा जन्मोत्सव सूर्योदयाच्या वेळेस मोठ्या उत्साहात गुलाल पुष्प उधळत साजरा केला.
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला संपन्न होणाऱ्या सूर्योदय समयीच्या या जयंतीसाठी रामभक्तांनी गेले तीन दिवस विशेष मेहनत घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केलेले दिसून येत होते. सातारा शहरातील राजवाडा परिसरातील वीर हनुमान मंदिरात जयंती उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई तसेच हनुमानाला विशेष चांदीचे अलंकार घालून मंत्रोचारात पूजा व अभिषेक करण्यात आला. यादव गोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराला गेले तीन दिवस गेलेली विद्युत रोषणाई लक्षवेधक ठरत आहे. या मंदिरात आज सकाळी सूर्योदय समयी सातारा येथील युवा कीर्तनकार ध्रुव पटवर्धन यांचे सुश्राव्य जन्म काळाचे किर्तन झाल्यावर महिलांनी पाळण्यात श्रीफळ रूपी बाल हनुमानला जोजविले, आणि पाळणा व अंगाई गीते म्हणून जन्मोत्सव साजरा केला. यावेळी गुलाल व पुष्प उधळून भक्तांनी हनुमानाचा जयजयकार केला. सातारा शहरातील मंगळवार पेठेतील श्री मंगल मारुती व शनी देवस्थान च्या वतीने श्री मंगल मारुती मित्र मंडळ आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा 2024 कार्यक्रमात 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वा मंत्रजागर करण्यात आला, तसेच 23 एप्रिल रोजी पहाटे 5 .30 वाजता भास्कर बुवा काणे यांचे सुश्राव्य कीर्तन सादर झाले.
सायंकाळी 5 वा चैतन्य भजनी मंडळ सौ पुरोहित यांची भक्तीमय भजन सेवा रात्रौ 8 वा श्री ची महाआरती होऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी बघण्यासाठी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.
दरम्यान सातारा शहरातील शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रोडवरील शनी मारुती मंदिरात हनुमान जयंती निमित्त अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिरा आयोजित करण्यात आले होते. सकाळी आठ ते चार या वेळेत शेकडो हनुमान भक्तांनी रक्तदानाचा सामाजिक उपक्रम पार पाडला. तसेच न्यू इंग्लिश स्कूल चौकातील सोन्या मारुती मित्र मंडळानेही रक्तदान शिबिर आयोजित केले होते. चौकात काढलेली पवनपुत्र हनुमानाची विविध रंगी रांगोळी विशेष लक्ष वेधून घेणारी होती.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर या ऐतिहासिक डोंगरावर स्वयंभू हनुमानाची मूर्ती आहे. सातारा जिल्ह्यातील हजारो हनुमान भक्त मध्यरात्रीपासूनच जरंडेश्वर कडे कुच करत होते /पहाटे या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने हनुमान जन्मोत्सव हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंदिराचे पुजारी धनंजयगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजित आयोजन करण्यात आले होते.
सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरील मारुती मंदिरात तसेच अजिंक्यतारा डोंगरावरील रस्त्यावरचा मारुती, गुरुवार पेठेतील दंग्या मारुती, नटराज मंदिरातील दास मारुती, शनिवार पेठेतील विष्णू मंदिरा नजीकचा काळा मारुती येथेही जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला. सातारा तालुक्यातील सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थानच्या वतीने सज्जनगडावरील पेठेतील मारुती मंदिरात जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कराड तालुक्यातील चाफळ येथील श्रीराम मंदिरातही हा हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला.
माण तालुक्यातील वावरहिरे येथील हनुमंत महाराजांच्या श्री राम मंदिरात व गोंदवले बुद्रुक येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरातही हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. फलटण येथील नाईक निंबाळकर यांच्या श्रीराम मंदिरातील हनुमान मंदिरातही हा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुती पैकी मसूर उंब्रज चाफळ इ. ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरातही हनुमान भक्तांनी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. अनेक हनुमान मंदिर व सेवा मंडळाच्या वतीने भंडारा म्हणजेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |