11:45am | Apr 23, 2024 |
कराड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला वीस वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पिडीत मुलीला एक लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही देण्यात आला. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.
सागर शरद लोंढे (वय २८, रा. हजारमाची, ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील सागर लोंढे याची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यानंतर फोन, मेसेजवर ते एकमेकांच्या संपर्कात होते. ही बाब मुलीच्या घरी समजल्यानंतर त्यांनी सागर लोंढे याला जाब विचारला. त्यावेळी त्याने मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगितले. तसेच तो मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. आई आणि आज्जीशी त्या मुलीची ओळख करून दिली. आई आणि आज्जी कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सागर लोंढे याने संबंधित मुलीवर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे याबाबत डिसेंबर २०२० मध्ये कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. सागर लोंढे याच्यावर बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. वरोटे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख ८० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला हवालदार सुर्यकांत खिलारे यांनी सहकार्य केले.
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |